घरगुती जाचाला कंटाळून नवविवाहितेही आत्महत्या

क्राईम सोलापूर

पतीसह तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल
पंढरपूर :
तुझ्या घरच्यांनी लग्नात आमचा मानपान नीट केला नाही,तुला स्वयंपाकही नीट करता येत नाही असे म्हणून सासरच्या लोकांनी सतत छळ केल्याने रोजच होणाऱ्या घरगुती जाचाला कंटाळून जैनवाडी ता. पंढरपूर येथील नवविवाहित महिला पूजा महेश लिंगडे हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली.      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पूजा भोसले हिचा विवाह महेश महादेव लंगडे यांच्याशी नुकताच झाला होता.विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी पूजा हीच नवरा,सासू,सासरे व दीर यांच्याकडून पूजाला घालून पाडून बोलणे सुरू होते.तसेच ते सतत तिला लग्नात तुझ्या घरच्यांनी आमचा मानपान केला नाही,तुला स्वयंपाकही नीट करता येत नाही म्हणून सतत त्रास देत होते.त्यामुळे रोजच होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पूजाने दि.१० ऑगस्ट रोजी सासरच्या घरी दुपारी बाराच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत मयत पुजाचा भाऊ चैतन्य राजू भोसले रा.कासेगाव याने दिलेल्या जबाबावरून मयत पुजाचा नवरा महेश महादेव लिंगडे, दिर प्रशांत महादेव लिंगडे,सासरे महादेव ज्ञानू लिंगडे, सासू जया महादेव लिंगडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दाखल केला आहे.याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि दिवसे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *