आज पासून बेमुदत बंदचा इशारा
बार्शी (तालुका प्रतिनिधी) : राज्यव्यापी रेशन घोटाळा प्रकरणी सध्या पोलिसां मार्फत सुरू असलेल्या चौकशीला विरोध दर्शवत या विरोधात आज बुधवारपासून बेमुदत आडत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय बार्शी मर्चंट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे याबाबत शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनावर मर्चंट असोसिएशनचे सचिव भरतेश गांधी यांची एकमेव स्वाक्षरी आहेअधिक माहिती अशी की पनवेल पोलिसांनी ३३लाख रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडून बार्शीतील आडत व्यापारी भीमाशंकर खाडे यांच्यासह अन्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करत आहेत तसेच बार्शीतील पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये ही बार्शीतील काही आडत दुकानात मोठ्या प्रमाणात रेशचे धान्य पोलिसांनी जप्त करून कारवाई केली आहे तसेच वैराग येथील आडत दुकानातून लाखो रुपये किंमतीचे रेशनचे धान्य जप्त करण्यात आले आहे शिवाय उपळाई ठोगे येथील रेशन दुकानाचे धान्य शेतातून जप्त केले आहे शिवाय पनवेल पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील बार्शीतील आडत व्यापाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे त्यामुळे काही व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत मागील तीन चार दिवसांत मार्केट यार्डला पोलीस ग्राउंड चे स्वरूप आले आहे अशा व्यापाऱ्यांनी आज मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे तसेच सदर चौकशीला आमचा विरोध नाही पण चौकशी पोलिसां ऐवजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां मार्फत करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कोणते धान्य शासकीय आहे आणि कोणते धान्य शेतकरी आहे याबाबत ओळखण्यासाठी आम्हाला ज्ञान नाही आणि चौकशी करण्याचा आम्हाला अधिकार ही नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
एकंदर व्यापाऱ्यांच्या या निवेदना बाबतीत आणि बेमुदत बंद च्या बाबतीत आज सोशल मीडियावर वेगवेगळा मतप्रवाह तसेच काही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आता प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
ReplyForward |