नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यापाराला पंधरा लाखाला फसवले

0
56
सोलापूर : सोरेगाव येथील बरकत गोट फार्म मध्ये पैसे गुंतवणूक करून वार्षिक  ३५ टक्के नफा मिळवून देतो असे म्हणून फसवणूक केल्याची घटना दि.१५ सप्टेंबर २०२० रोजी घडली.याप्रकरणी सुलतान अ.हमीद मुल्ला (वय-३८,रा.बेगम पेठ,सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यांच्या फिर्यादीवरून आकीबखान हरूणखान पठाण व साकिबखान हरुणखान पठाण (दोघे रा.मल्लीकर्जून नगर,होटगी रोड,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की,बरकत गोट फार्म येथे वार्षिक ३५ टक्के नफा मिळवून देतो,असे सांगून फिर्यादी व फिर्यादीच्या सासर्‍यांची एकूण पंधरा लाख रुपये इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केली.त्यानंतर फिर्यादी यांनी वरील संशयित आरोपींकडे पैशाची विचारपूस करून पैसे मागितले असता,फिर्यादीला उडवा-उडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ करून फिर्यादी आणि फिर्यादीच्या बायकोचे हात-पाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी साकीबखान पठाण यांने दिली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here