सरकारी कामात अडथळा एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य प्रतिनिधी

बार्शी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी रस्तापुर ता बार्शी येथील एकाच कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये पांडुरंग विठ्ठल बरबडे,विनोद पांडुरंग बरबडे, सुब्राव पांडुरंग बरबडे आणि भाग्यश्री उर्फ दिदी पांडुरंग बरबडे रा सर्व रस्तापुर अशी दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अधिक माहिती अशी की रस्तापुर येथील शेतकरी दादा माणिक बरबडे यांच्या अर्जावरून मोजणी करून हद्दखुणा करण्यासाठी बार्शी भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमापक  नानासाहेब घुमरे हे आज दि २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रस्तापुर येथील गट नंबर ६२ गेले होते यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ही घेण्यात आला होता फिर्यादी घुमरे हे हद्दीखुना करत असताना वरील आरोपी तेथे आले आणि तुम्ही हद्दखुणा करू नका असे म्हणत गोंधळ करू लागले म्हणून फिर्यादीने तुम्ही कोण आहेत ? आणि तुमच्याकडे कोर्टाचा निकाल किंवा आदेश का  असे विचारले असता वरील लोकांनी शिवीगाळ करून तुम्ही आताच्या आता इथून निघा असे म्हणत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे म्हणून भा द वि ३५३,३४ आदी प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय सूर्यवंशी करत आहेत

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *