पिण्याच्या पाणी पाईपलाईन कामावरून पेनूर मध्ये पेटला राजकीय वाद

ताज्या घडामोडी सोलापूर

परस्पर विरोधी ५ तक्रारी मध्ये पेनुरात ३४ जनांवर गुन्हे दाखल
जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
पेनूर (ता. मोहोळ) पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन च्या कारणावरुन विद्यमान ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक व विरोधी पार्टीतील ग्रा.पं. सदस्य व अन्य व्यक्तीं यांच्यामध्ये झालेल्या वादात परस्पर विरोधी पाच गुन्हे दाखल झाले असुन या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस (आय) च्या पदाधिकाऱ्यांसह एकुन २२ जनांसह अन्य १२ अशा एकून ३४ जणावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना दि. २६ मार्च रोजी दुपारी पेनुर येथे घडली  .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, प्रारंभी पेनुर येथील मुस्लीम समाजाच्या दफनभुमी जवळील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन च्या कामावरून दोन गटामधील झालेल्या वादात विद्यमान ग्रा. पं सदस्य रामदास चवरे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्या प्रकरणी विठ्ठल माने, शरद पोरे, अंकुश चवरे, तानाजी सावंत, लक्षण चवरे व अन्य सात अशा एकून १२ जनाच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान या वादानंतर पेनुर ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून ग्रामसेवक संतोष पाटील हे याच पाईपलाईन संदर्भात उद्भवलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी मोहोळला गट विकास अधिकारी यांच्याकडे निघाले असताना तू ऑफिसच्या बाहेर जायचे नाही, असे म्हणत ग्रामसेवकाच्या गच्चीला धरून खुर्चीवर बसवले. याप्रकरणी विठ्ठल माने आणि शरद पोरे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामसेवक संतोष पाटील यांनी फिर्याद दिल्याचा गुन्हा दाखल झाला .
ही घटना घडल्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अनिल तानाजी राजगुरू हे गावातील मंदिराजवळ उभे राहीले असता ग्रा.पं. सदस्य रामदास चवरे यांनी तू राहतो ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे, ती आता आम्ही ताब्यात घेणार आहोत. असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ग्रामसेवक संतोष पाटील, रामदास चवरे, राजकुमार सलगर, सुधीर मांदे, बाळासाहेब चवरे, रमेश माने यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला  .
     याच वेळी देवानंद आदिनाथ चवरे यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये ग्रामपंचायतीच्या बोअरच्या पाइपलाइन तक्रारीवरुन सुरू असलेल्या वादा वेळी विठ्ठल माने यांना होणारी मारहान सोडविण्यासाठी तिथे गेलो असता, सोडवासोडवी करत असताना तू मध्ये का आला म्हणून, रामदास चवरे यांनी मारहाण करून गळ्यातील दोन तोळे ची सोन्याची चैन खेचून घेत शिवीगाळ केल्या प्रकरणी रामदास चवरे, चरणराज चवरे, राजकुमार सलगर, सागर चवरे, बाळासाहेब चवरे व अन्य चार ते पाच जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                 दरम्यान २६ मार्च रोजी दुपारी ३ .१५ चे दरम्यान  मुस्लिम दफनभूमी जवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरला का हात लावला म्हणुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुहास आवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानाजी माने, सर्जेराव चवरे, दिग्विजय माने, सज्जन चवरे, देवानंद चवरे, सर्जेराव पवार, तानाजी सावंत, रजनीकांत चवरे, दत्ता सावंत यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशा वेगवेगळे ५ परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत. एकाच दिवशी पेनुर गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शासकीय कामात अडथळा, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी व मारहाण अशा वेगवेगळ्या परस्परविरोधी पाच तक्रारी दाखल झाल्याने घटनास्थळाला जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला .

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *