File charges against those who insist on buying books and uniforms from school

शाळेतूनच पुस्तके गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास धरणार्‍यां विरोधात गुन्हे दाखल करा

Uncategorized ताज्या घडामोडी देशविदेश

शाळेतूनच पुस्तके गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास धरणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करा

अकोला : शाळेतूनच विद्यार्थ्यांसाठी लागणारी शालेय सामग्री आणि गणवेश खरेदी करण्याची सक्ती खाजगी शिक्षण संस्था चालकांकडून पालकांना सक्ती करता येत नाही आणि त्यांनी तशी सक्ती केल्या अशा संबंधित संस्थाचालकांविरोधात शिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे, असे निर्देश अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ कडू यांना यासंदर्भात भेटण्यासाठी आले होते. पालकांनी त्यावेळी तक‘ारीचे निवेदन देऊन विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमून दिलेल्या विक‘ेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती संस्थाचालकांकडून केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली.

त्यावेळी कडू संबंधित पालकांना आश्वस्त करताना म्हणाले, अशाप्रकारची सक्ती शिक्षण संस्थाचालक करु शकत नाही आणि तशा प्रकारचा त्यांना कोणताच अधिकार नाही. विद्यार्थ्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य पालक हवे तेथून घेऊ शकतात. संबंधित शिक्षण अधिकार्‍यांकडे पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध तक‘ार करावी.

अशी तक‘ार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश कडू यांनी दिले. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मु‘य कार्यकारी अधिकारी यांनीही यासंदर्भात वेळचे वेळी आढावा घेऊन पालकांच्या तक‘ारींचे निराकरण करावे, असे निर्देश कडू यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *