टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल प्लाझावर (FASTag) अनिवार्य केला आहे. टोल प्लाझावर वाहनांच्या लागणाऱ्या रांगापासून सुटका करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात यात तांत्रिक अडचणी येत असल्याने पूर्वीसारखाच वेळ जात असल्याचे काहींचा अनुभव आहे. यावर आता प्रशासनाकडून नवीन आदेश आला आहे. टोल नाक्यावर Fastag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे न देता वाहनाला सोडावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी कवी, गीतकार संदीप खरे यांना फास्टॅग संदर्भात वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सोशल मीडियातून कथन केला होता. “संदीप खरे यांच्या गाडीवरील FASTag स्कॅन न झाल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याने गाडी थांबवली. त्यानंतर एका छोट्या मशीनने तो टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल असं सांगण्यात आलं. यात टोल 75 आणि दंड 75 रुपये अशी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे फास्टॅग असल्याने मी भरणार नसल्याची भूमिका खरे यांनी घेतली. त्यावर तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. काही वेळाने मॅनेजर आला, त्यानेही दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. नंतर तो टॅग स्कॅन झाला.” मात्र, या सर्व घडामोडींमध्ये माझे 10 मिनीटे वाया गेले. यावर संबंधीत प्रशासनाने काहीतरी उपाय काढण्याची विनंती खरे यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देण्याचंही ते बोलले होते.

पण, यापुढे आता टोल नाक्यावर फास्टॅग (Fastag) मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे न देता वाहनाला सोडावे लागणार आहे. तसा शासन आदेश काढण्यात आला आहे.

FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?
देशातील सर्व टोलनाक्यांवर आजपासून FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. FASTag नसल्यास वाहन चालकांना दुप्पत टोल भरावा लागणार आहे. मात्र हे FASTag नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? ते कुठे मिळतं? असे अनेक प्रश्न अनेकांना आहेत. तर फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते.

रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते आणि टोल प्लाझावर होणारी ट्रॅफिक जॅमची कटकटही कमी होण्यास मदत होईल.

भारत सरकारचा आदेश

टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही, वाचा नवीन नियम
टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही, वाचा नवीन नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *