अधिकाऱ्यांनी देखील केली लाखोंची गुंतवणूक ; फिर्यादीची माहितीविराट फ्युचर कंपनीचा घोटाळा कोट्यवधीत

ताज्या घडामोडी सोलापूर

 सोलापूर (प्रतिनिधी) विराट फ्यूचर कंपनीतील घोटाळ्याचे दररोज मोठमोठे आकडे समोर येत आहेत. कालपर्यंत लाखों मध्ये असलेला हा घोटाळा आता करोडोंच्या घरात पोहोचला आहे. या कंपनीमध्ये प्रथम दर्शनी ३४ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. मात्र त्यानंतर दररोज नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. यात सात ते आठ कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती फिर्यादी कडून पोलिसांना देण्यात आली.

विराट फ्युचर कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणूक केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त रकमेचा परतावा मिळतो असे आमिष दाखवत दोघांनी सातजणांची लाखोंची फसवणूक केल्याबद्दल विजापूर नाका पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला.या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनी हा पोलिसांच्या हातात लागला नसला तरी त्याचा साथीदार डोंगरी याला अटक करण्यात आली असून चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान विराट फ्युचर कंपनी मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या रकमेतून डोंगरी याने कोट्यावधी रुपयांची माया कमावली आहे.या रक्कमेतुन डोंगरी याने मॅट्रोसिटी मध्ये संपत्ती घेतली आहे. यात मुंबई मध्ये आलीशान फ्लॅट असुन त्याच्याकडे बीएमडब्लू कार आहे.याच बरोबर मोहोळ येथे संपती असल्याची माहिती गुंतवणूकदारांकडून देण्यात आली.यात मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील लोखा रुपयांची गुंणतवूक केल्याचे समोर येत आहे.  

दै.जनसत्यची बातमी पाहताच विराट फ्युचर कंपनीत गुंतवणूकीतुन फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे शहर जिल्ह्यातून फिर्यादीना फोन येत असून,याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक नवीन गुंतवणुकदार पुढे येत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *