लग्नाची ‘वेगळी’ गोष्ट! 80 वर्षाच्या आजीनं 35 वर्षांच्या तरुणाशी थाटला संसार

ताज्या घडामोडी देशविदेश

लंडन : आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला प्रेम होऊ शकतं. प्रेमात वय, जात पात, धर्म, पंथ, श्रीमंती, गरीबी, काळा आणि गोरा असा कोणताही भेदभाव केला जात नसतो. प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात आणि त्याला कोणत्याही सीमांत कैद करता येत नसतं. 80 वर्षाच्या आजीनं याचं उदाहरण घालून दिलंय. तिनं वयाच्या सर्व मर्यादा तोडत आपल्यापेक्षा 45 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर हे दोघं आता सोबत राहत आहेत.

ब्रिटनमध्ये राहणारी ही 80 वर्षाची आजी तिच्यापेक्षा 45 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्या दोघांनी नुकतचं लग्न केलं आहे. ब्रिटनमधील या 80 वर्षीय आजीचं नाव आयरिस जोन्स असं आहे. तिनं 35 वर्षीय मोहम्मद इब्राहिमशी लग्न केलं असून तो इजिप्तचा रहिवाशी आहे. या दोघांची मैत्री फेसबुकच्या माध्यमातून झाली. हे दोघेही तासनतास एकमेकांशी फेसबुकवर गप्पा मारतात. काही दिवसांनंतर इब्राहिमनं आयरीसवर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं. त्यानंतर आयरीस आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी थेट इजिप्तला जाऊन पोहचली. याचे फोटो तिनं सोशल मीडियावरही टाकले. त्यानंतर हे  फोटो प्रचंड व्हायरल होतं आहेत.

अल वतनने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. दोघांचं लग्न अतिशय गुप्त पद्धतीनं झालं आहे. यासाठी आयरिसनं मुस्लिम धर्म स्विकारला आहे. मोहम्मद इब्राहिमनं म्हटलं की, मला आयरिसचे पैसे नको आहेत. त्यांना फक्त आयरिसचं  प्रेम हवं आहे. त्यानं असंही सांगितलं की, आयरिसला पाहिल्यावर हेचं आपलं खरं प्रेम आहे, हे मला समजलं. आयरीस भेटल्यामुळं मी खूप आनंदी आहे, असंही त्यानं यावेळी सांगितलं.

यापूर्वी हे जोडपं एका कार्यक्रमात देखील दिसलं आहे. त्यानंतर जिकडे तिकडे या जोडप्याचीच चर्चा सुरू होती. आयरिसने या टीव्ही शोमध्ये तिच्या लैगिंक आयुष्यावर उघडपणे बोलली. या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, आम्हाला आमचं प्रेम मिळालं आहे. आम्ही नुकतचं हनिमूनलाही जाऊन आलो आहोत. पम लैगिंक आयुष्यात आम्ही फारसं खुश नाही आहोत. खरंतर लग्नानंतर आयरीसच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं आहे. आयरीस सध्या तिच्या पतीसोबत इजिप्तमध्ये राहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *