कर्जाला कंटाळून आंबेवाडी येथे एकाची आत्महत्या

क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्र


उस्मानाबाद– उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील एकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दि.22 रोजी दुपारी 12 वाजणेच्या दरम्यान घडली आहे.   याबाबत माहिती अशी की,आंबेवाडी येथील अशोक रामदास कदम (54) या शेतकऱ्याकडे विकास सोसायटी आणि अलाहाबाद राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज होते. गेल्या दोन तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नव्हते. परिणामी कदम यांना कर्ज फेडणे मुश्किल झाले होते. यातच त्यांच्या डोक्यावरचा घराचा निवाराही निसर्गाने हिरावला होता. यामुळे ते कायम तणावात होते. शेवटी त्यांनी या सर्व गोष्टींना कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. बेंबळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रेत शवविच्छेदन नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी 8 वाजता त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *