नववी-अकरावीच्या परीक्षा होणार रद्द?दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काहीच दिवसात होणार निर्णय,

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत आज शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली. दरम्यान याबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड चर्चा करून पुढील चार पाच दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.दुसरीकडे इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षा घेऊ नये असा सूर होता असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा होणार नाहीत, अशी शक्यता अधिक आहे. याबाबत शालेय शिक्षण विभाग उद्यापर्यंत अधिकृत माहिती जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा अजून पुढे असणार आहेत, तोपर्यंत राज्यातील कोरोना स्थिती काय आहे याचा आढावा घेऊन सीएम आणि मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, ही संख्या दररोज पन्नास हजाराने वाढत आहे. अशा कालावधीमध्ये राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा घ्याव्या की नाही, याविषयी आज शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंथन केले. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊ नये पण इयत्ता नववी आणि अकरावीच्या या ऑफलाइन परीक्षा घेण्यास काही वरिष्ठ लोकांनी हरकत घेतली आहे. कारण की इयत्ता नववी आणि अकरावीतील परीक्षा घ्यायच्या असतील तर परत कॉलेज आणि शाळा सुरू कराव्या लागतील. अशावेळी पुन्हा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *