अक्कलकोट तीर्थ विकासासाठी शंभर कोटी निधी देणार ; एकनाथ शिदें

ताज्या घडामोडी सोलापूर


अक्कलकोट :
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यानी सर्व तालुकाप्रमुख याना आपापल्या तालुक्याच्या विकासासाठी निवेदन देण्यास सांगीतले होते अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संजय देशमुख यानी अक्कलकोट तीर्थविकासा साठी शंभर कोटी ची मागणी केली अक्कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिर असुन इथे दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन भक्त येतात म्हणुन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यानी अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून १६६ कोटी रु तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर केले ,अध्याप पर्यंत केवळ ३० कोटी रु निधी मिळाले आहे त्यामुळे अक्कलकोट चा विकास थाबंला असुन  उर्वरित निधी मंजूर करावी असे सजंय देशमुख यानी मागणी केली, अक्कलकोटच्या विकासा साठी निधी कमी पडू देणार  नाही लवकरच १०० कोटी रु निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर करू असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या वेळी बोलताना संजय देशमुख म्हणाले तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत शहरातील पालखी मार्गाचे रुंदीकरण व सुशोभीकरण, पंढरपूरप्रमाणे भक्तांच्या निवासासाठी भव्य भक्तनिवास, अत्याधुनिक पध्दतीचे संस्कृतीत भवन,अक्कलकोट शहरासाठी रोज पाणीपुरवठा करण्यासाठी हिळ्ळी येथुन दुहेरी पाईपलाईन करणे,बायपास रोड जवळील मिनाताई ठाकरे उदयानाचे सुशोभीकरण करणे व व्यापारी संकुल बाधंणे,एम एस ई बी चौक ते मंदिर पर्यंत विद्युतीकरण  करणे,एवन चौक ते शिवपुरी(यज्ञनगर) पर्यंत विद्युतीकरण व सुशोभीकरण  करणे,स्व,बाळासाहेब ठाकूरे चौक येथील तारामाता उद्यान सुशोभीकरण करणे, एस टी बस स्टॅड अत्याधुनिक व सुशोभीकरण करणे , अक्कलकोट शहराचा व तालुक्याचा विकास करण्यात येणार आहे असे म्हणाले या वेळी सोपन निकते शहरप्रमुख योगेश पवार उपप्रमुख प्रविण घाटगे प्रा.सुर्यकांत कडबगावकर आनंद बुककानुरे सैपन पटेल युवासेना शहर प्रमुख विनोद मदने दुधनी शहर प्रमुख संतोष गद्दी प्रसिद्धीप्रमुख बसवराज बिराजदार खंडु कलाल व इतर शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *