थंडीत पुन्हा महागणार अंडी; गेल्या 3 वर्षातील किंमतीचा रेकॉर्ड मोडीत

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : थंडीच्या दिवसांत पुन्हा एकदा अंड्याचे भाव वाढले आहेत. अंड्याचा भावगेल्या 3 ते 4 वर्षातील रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 20 डिसेंबर रोजी अंड्याच्या ओपन मार्केट रेटने मागील तीन वर्षातील ऑफिशियल रेटचा रेकॉर्ड तोडला आहे. एका दिवसापूर्वी देशातील सर्वात मोठ्या बरवाला ओपन मार्केटमध्ये अंड्याची 550 रुपये प्रति शेकडापर्यंत विक्री झाली आहे. येत्या दिवसात हा रेट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठ्या बरवाला बाजारपेठेत 100 अंड्यांचा अधिकृत भाव 420 रुपयांवरून 521 रुपयांवर पोहचला आहे. एक-दोन महिन्यात नाही, तर केवळ 24 तासात अंड्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहचला आहे.

कोंबड्यांमध्ये आरडी नावाचा आजार पसरला असून अंड्यांचं उत्पादन कमी झाल्याची चर्चा आहे. आरडी या आजारामुळे कोंबड्यांना पोटात त्रास होतो, त्यामुळे त्यांना सतत औषध दिलं जातं. त्याना खाणं दिलं जात नाही. त्यामुळे खुराक न मिळाल्याने कोंबडी अंड देत नाही, असं काहींचं म्हणणं आहे.

परंतु देशातील सर्वात मोठी अंड्यांची बाजारपेठ असलेल्या बरवालातील व्यापारी ही केवळ अफवा असल्याचं सांगत आहेत. अंडी बाजारातील जाणकारांनी, मोठे व्यापारी अंडी महाग होण्यासाठी, अंडी महाग होण्याच्या दृष्टीने ही एक युक्ती करत असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *