अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे!

0
58

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीनं आपल्या कारवाईचा फास अधिकाधिक आवळायला सुरुवात केली आहे. एकीकडे ईडीनं वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नसताना दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली आहे. आज दुपारी ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. यासोबतच, ईडीनं नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापे टाकले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यावर आणि मुंबईच्या वरळी येथील सुखदा अपार्टमेंटमध्ये असलेल्या निवस्थानी देखील छापे टाकले आहेत. मात्र, शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या श्री. साई शिक्षण संस्थेवरही छापे टाकले. या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत एनआयटी महाविद्याालय येते. एनआयटी महाविद्यालयात पॉलीटेक्निक, एमबीए आणि अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. मिळालेल्या महितीनुसात दुपारी ११ वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी महाविद्यालयात पोहचले व थेट कारवाईला सुरुवात केली. कारवाईदरम्यान महाविद्यालयाचे अकाउंट्ससह संगणाकतील इतर माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोळा केली. विशेष म्हणजे ईडीकडून अनिल देशमुख यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले असून त्यांना मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच त्यांच्या महाविद्यालयावर छापे टाकण्यात आल्याची चर्चा शहरात सुरु आहे.अनिल देशमुख यांना ईडीनं आत्तापर्यंत चार वेळा समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत?दरम्यान, दुसरीकडे सीबीआयकडून देखील अनिल देशमुख प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. सीबीआयनं न्यायालयात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या एका एसीपींनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा CBI नं केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. “महाराष्ट्र सरकार तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील अनिल देशमुख प्रकरणातील तपास पथकाला सहकार्य केलं जात नाही. सहकार्य करण्याऐवजी मुंबईचे एक एसीपी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याला धमकी देत आहेत”, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here