संजय दत्तला Cancer तिसऱ्या स्टेजवर; उपचारासाठी तातडीने अमेरिकेला हलवणार

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : अभिनेता संजय दत्तबद्दल एक मोठी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. त्याला Lung Cancer असून तो तिसऱ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दत्तला तातडीने अमेरिकेत पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची Corona चाचणीसुद्धा झाली. Covid-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच आता ही धक्कादायक बातमी आली आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे अभ्यासक आणि संपादक संजय नहाटा यांनी याबाबतचं Tweet केलं आहे.

तब्बल 6 तासांपूर्वी संजय दत्त यांनी ट्विटरवरुन चाहत्यांना आपण वैद्यकीय उपचारांसाठी छोटा ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. माझी काळजी करु नका मी लवकरच येईन, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता चित्रपट समीक्षकांनी त्यांना Lung Cancer असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *