आर्थिक अमिषाच्या फायद्याने केली लाखोंची गुंतवणूक अन् ३४ लाख ४७ हजारांची झाली फसवणूक

क्राईम सोलापूर

आरोपी म्हणत आर्थिक रक्कमेचा होईल फायदा आता पोलीसच दाखवतील आरोपींना कायदा

?

पनवेलच्या सोनी आणि मोहोळच्या डोंगरीने घातली लाखोंना टोपी*

?

*विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) : विराट फ्युचर कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणूक केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त रकमेचा परतावा मिळतो या आमिषाने सात जणांची ३४ लाख ४७ हजारांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात दि. १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कामठा हरिदास सोनी रा.पनवेल, नवी मुंबई व फजलोद्दीन फकरोद्दीन डोंगरी रा. मोहोळ ,जिल्हा ,सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विराट फ्युचर कंपनीने २०१८ साली बालाजी सरोवर येथे कंपनीच्या गुंतवणुकीच्या पुढील योजना सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनार करिता जरीना फिरोज पठाण (वय-४५) रा. टिळक नगर,मजरेवाडी,होडगी रोड,सोलापूर यांना व त्यांच्या पत्नीस बालाजी सरोवर येथे आरोपी सोनी व डोंगरी याने येण्यास सांगून दोघांनाही नवीन बिजनेस संदर्भात माहिती दिली.व या दोघांचा विश्वास संपादन करून रक्कम गुंतवण्यास सांगितले. या गुंतविलेल्या रकमेचा आर्थिक फायदा फिर्यादीला भरपूर होईल असे सांगितले. व त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम भरून घेऊन त्यांना त्याबदल्यात आर्थिक फायदाही झाला. व व पती-पत्नीस कंपनीबाबत अधिक विश्वास वाटू लागल्याने दोघांनीही मोहोळ येथे बोलून पुन्हा विराट फ्युचर या कंपनीमध्ये अधिक रक्कम गुंतवणूक करण्यास सांगुन ती भरून घेण्यास घेतली. मात्र विराट फ्युचर कंपनीत जरी ना यांनी दहा लाख १५ हजार रुपये अशी रक्कम गुंतवणूक केली असून त्यांना कंपनीकडून आतापर्यंत पाच लाख ७६ हजार रुपयांचा परतावा म्हणून बँकेच्या खात्यावर जमा झाले आहेत. दरम्यान सप्टेंबर २०१९ नंतर विराट कंपनीने परताव्याची रक्कम देण्यास बंद करून त्यांनी स्वतःची वेबसाईट देखील बंद केली. सोनी आणि डोंगरी यांच्याकडे गुंतवणूक रकमेबाबत विचारपूस केली असता तुम्ही काही काळजी करु नका तुमची रक्कम थोड्या दिवसात बँकेच्या खात्यावर जमा होईल असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आरोपी यांनी माझा व लोकांचा विश्वास संपादन करून आम्हाला विराट कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. व मला व व इतर गुंतवणूकदारांना चेक देऊन दिलेले चेक न वाटता परत आलेले. माझ्यासह गुंतवणूकदारांची ३४ लाख ४७ हजार रुपये रक्कम गुंतवणूक करून घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई मस्के हे करित आहेत.


या गुंतवणूकदारांची झाली फसवणूक

जरीना फिरोज पठाण – ४ लाख ३५ हजार

इमरान अब्दुलरशिद लंगोटे – ३ लाख ३९ हजार

सलीम कुतबोद्दीन शेख – १५ लाख

सलीम अमीर पठाण – २ लाख ३३ हजार

रमेश शिवाजी कमलापुरे – १ लाख ५१ हजार

वसीम नबीलाल शेख – ४ लाख ५३ हजार

दौला बंदगीसाब सय्यद – ३ लाख ३६ हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *