12 वी नापास अन् MBBS डॉक्टर, शिरुरमध्ये ‘देवमाणूस’चा पर्दाफाश

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे : अशाच एका बोगस डॉक्टरचा (Doctor) ऐन कोरोना काळात पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने  (Pune Police) शिरूर तालुक्याच्या कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या श्री मोरया हॉस्पिटल (Mr. Moraya Hospital) येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये एकूण 22 कोविड 22 रुग्ण होते, त्यात 6 ऑक्सिजन बेडवर, 2 व्हेंटिलेटरवर तर आज सकाळी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

2 वर्षांपासून अधिक काळ हॉस्पिटल सुरू होतं. विशेष म्हणजे, या बोगस डॉक्टरचे शिक्षण 12 वी नापास असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारेगाव येथील  मेहमूद फारुक शेख याने महेश पाटील नावाने बोगस सर्टिफिकेट घेऊन तो महेश पाटील नावाने श्री मोरया नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याबाबतची खबर डॉ.शीतलकुमार राम पाडवी या त्यांच्याच पार्टनरने  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना दिली होती आणि मग हा प्रकार उघड झाला आहे.

बोगस डॉक्टरचा प्रकार भागीदारानेच केला उघड

या घटनेतील तक्रारदार असलेले डॉक्टर शीतलकुमार पडवी हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवापूर येथील रहिवासी असून 2016 मध्ये त्यांची या बोगस डॉक्टरासोबत ओळख झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये डॉक्टर शीतलकुमार यांना या बोगस डॉक्टरने भेटून आपण दोघे समसमान पैसे भरुन पार्टनरशीपमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू करू असे सांगितले. यासाठी बजाज फायनान्स कंपनीकडून हॉस्पिटल करता कर्ज मंजूर करून घेऊन 13 लाख 61 हजार 441 रुपये जमा केले.

यातील दोन लाख रुपये इमारतीचे मालक ओस्तवाल यांच्या नावे महेश पाटील यांच्याकडे दिले. सदरचा चेक महेश पाटील यांनी ओस्तवाल यांना दिला. त्यानंतर महेश पाटील यांनी ओस्तवाल यांच्याकडून करारकरून बिल्डिंग भाड्याने ताब्यात घेतली. त्यानंतर महेश पाटील वारंवार डॉ.शितलकुमार त्यांच्याकडे हॉस्पिटलच्या कामास पैसे मागत होता. हॉस्पिटलचे फर्निचर, हॉस्पिटलच्या साहित्य करता रोखीने अंदाजे 10 लाख रुपये व चेकद्वारे 5 लाख 50 हजार रुपये ओस्तवाल यांच्या नावे दिलेला 2 लाख रुपये याप्रमाणे 17 लाख 50 हजार रुपये महेश पाटील यांच्या नावाने दिले.

हे सर्व पैसे शितलकुमार यांचेच वापरले गेले. शीतल कुमार यांचे पैसे वापरून मोरया हॉस्पिटल तयार केले. कर्ज मंजूर होऊन ते पैसे हॉस्पिटल करता वापरले होते. तरी देखील महेश पाटील यांच्या कर्जाकरिता रजिस्ट्रेशनची कागदपत्रे त्यास हजर करण्यास सांगितली होती. परंतु महेश पाटील हा रजिस्ट्रेशनची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत होता. 11 एप्रिल 2019 रोजी हे हॉस्पिटल सुरू केले गेले. यासाठी सर्व पैसे डॉक्टर शीतलकुमार यांनी गुंतवले होते. तरी देखील शीतलकुमार यांना न सांगता हॉस्पिटल चालू केले गेले. तेव्हा महेश पाटील नावाच्या या व्यक्तीने ‘तुमची पार्टनरशिप नकोय तुमचे पैसे मी तुम्हाला परत देतो तुम्ही आता हॉस्पिटलमधून बाजूला व्हा. तुम्ही गुंतवलेले पैसे मी तुम्हाला देतो’ असे सांगून घेतलेले कर्जाचे हप्ते चालू होते व फसवणूक झाली असल्याचे डॉक्टर शीतलकुमार यांच्या लक्षात आले. परंतु. पैसे परत देतो यामुळे त्यांनी त्या वेळी कुठेही तक्रार दिली नाही. शीतलकुुमार यांनी 2019नंतर नंदुरबार जिल्ह्यातील गताडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सरकारी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वेळोवेळी महेश पाटील यांच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु, पैसे दिले नाही.म्हणून अखेर पोलिसात तक्रार केली.

सदरचा हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते यांनी पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांना सूचना दिल्या होत्या. त्यांनी  त्यानुसार येथील उपनिरीक्षक अमोल गोरे, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार निलेश कदम, महेश गायकवाड, दत्‍तात्रय तांबे, जनार्दन शेळके, पोलीस नायक विजय कांचन, गुरु जाधव,मंगेश थिगळे, अजित भुजबळ यांचे पथक तयार करून शिरूरला रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने श्री मोरया हॉस्पिटल येथे डॉक्टर व्यवसाय करणारे मेहबूब फारुक शेख (मुळगाव- पीर बु-हानगर, नांदेड) यास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता तो कारेगाव येथे महेश पाटील नावाने वावरत असल्याची तसेच महेश पाटील (एम.बी.बी.एस) या नावाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून या प्रमाणपत्राच्या आधारे श्री मोरया हॉस्पिटल नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टाकून त्यात दोन वर्षापासून रुग्णांवर उपचार करून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. त्याने महेश पाटील नावाने बनावट आधार कार्ड व शिक्के देखील बनवून घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसंच मोरया मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चालू करण्याकरता शितलकुमार राम पाडवी यांचेकडून वेळोवेळी 17 लाख 50 हजार एवढी रक्कम घेऊन त्यांना हॉस्पिटल मधून बाजूला काढून त्यांची फसवणूक केली असल्याबाबत शीतलकुमार पाडवी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन दिली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र करडे यांनीदेखील पडताळणी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *