अजबच आहे! पत्नी म्हणते, तुम्ही माझ्या भावासारखे; वैतागलेल्या पतीने कोर्टाचं दार ठोठावलं

ताज्या घडामोडी देशविदेश

भोपाळ : भोपाळ येथील कोर्टात एका दाम्पत्याचं अनोख प्रकरण समोर आलं आहे. एका सासूने आपला मुलगा आणि सून यांच्या घटस्फोटासाठी कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे. जेव्हा सासूनं सून काय म्हणते हे सांगितलं तर काऊन्सिलरदेखील हैराण झाला. काही कारणामुळे पती-पत्नीमधील नातं जसं हवं तसं नाहीये, असं म्हणत सासून या दोघांना घटस्फोट द्यावा अशी मागणी केली आहे.

पती म्हणतो मला हे नातं नको..

पतीने काऊन्सिलिंगमध्ये सांगितलं की, तिच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र पत्नी जवळच येऊ देत नाही. आतापर्यंत त्यांच्यामध्ये एकदाही जवळीक झाली नाही. यावर पत्नी म्हणते..तुम्ही माझ्या भावासारखे आहात आणि विशेष म्हणजे तशीच वागणूक देते. पती म्हणाला की काही दिवसांनी पत्नीची वागणूक बदलेल या अपेक्षेने दीड वर्ष उलटून गेलं. इतकच नाही तर पत्नीला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाण्यात आलं. मात्र तरीही पत्नीमध्ये काहीच बदल होत नाही. यासाठी आता तलाक घेऊन हे नात संपवायचं आहे.

पत्नी म्हणते…

काऊंन्सिलिंगमध्ये पत्नी म्हणाली की, माझं कोणा दुसऱ्या पुरुषावर प्रेम नाही आणि माझ्यावर आई-वडिलांचा दबाव असल्याचं काही कारण नाही. ती इतक्या लवकर लग्न करू इच्छित नव्हती. मात्र जेव्हा घरात लग्नाचा निर्णय घेण्यात आला तर तिने होकार दिला. तिला लग्नापूर्वी पाहायला आलेल्या सासूचा स्वभाव खूप आवडला होता. त्यात लग्नानंतर पती खूप काळजी घेतात. तेव्हा मला असं वाटतं की कोणी भाऊ आपल्या बहिणीची काळजी करत आहे. पत्नी म्हणाली याच कारणामुळे त्यांच्यामध्ये जवळीक होऊ शकली नाही.

हैराण करणारा प्रकार

भोपाळच्या कुटुंब न्यायालयातील काऊन्सिलरने सांगितलं की, पत्नीने स्पष्ट शब्दात सांगितलं की, ती आपलं घर सोडून जाणार नाही. पती हवं तर दुसरं लग्न करू शकतो. ही घटना हैराण करणारी आहे. पुन्हा एकदा दोन्ही पक्षाची वेगवेगळी काऊंन्सिलिंग करण्यात आली. त्यावेळी पत्नी तलाक देण्यासाठी तयार आहे. मात्र तिला याच घरात राहायचं आहे. यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल शर्मा म्हणतात की, पत्नीमध्ये विकृती असण्याची शक्यता आहे. त्याकारणाने ती असा विचार करते. हा तिचा विचार आहे. अशात दबाव टाकला जाऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *