दया बेननं का सोडलं तारक मेहता का उल्टा चष्मा?; अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

ताज्या घडामोडी देशविदेश मनोरंजन

मुंबई – कलाकार जितके प्रसिद्ध असतात. तितकंच मोठं त्यांचं मानधन सुद्धा असतं. कलाकार आणि मानधनाचा मुद्दा हा काही नवीन नाही. असंच काहीसं सुरु आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये. यामधील अभिनेत्री दिशा वकानीम्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी ‘दयाबेन’आणि मालिकेमध्येसुद्धा ‘मानधन’चं अडचण ठरत आहे. त्यामुळे दिशा सध्या मालिकेपासून दूर आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडती मालिका बनली आहे.या मालिकेतील हलके-फुलके विनोद सर्वांनाच पोट धरून हसायला भाग पाडतात. यामधील प्रत्येक पात्र हे लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रत्येक पात्राने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त पसंत केलं जाणारं पात्र म्हणजे’दयाबेन’ होय. दयाबेनच्या निरागस विनोदानं लोकांना खळखळून हसू येतं. सर्वांना हे पात्र अगदी आपलसं वाटू लागलं आहे. मात्र 2017 पासून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मालिकेत दिसून येत नाहीय.गेल्या वर्षी मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांचा प्रवेश झाला आहे. मात्र चाहत्यांना खरी उत्सुकता आहे ती म्हणजे दयाबेनची. मात्र दयाबेन अजूनही मालिकेत परतली नाही. काही दिवसांपूर्वी दिशा वकानीनं ही मालिका कायमची सोडल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी याबद्दलची कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आत्ता दिशाचं मालिकेत नं येण्याचं कारण स्पष्ट झालं आहे.

कोईमोईच्या एका अहवालानुसार दिशा वकानी मालिकेत न परतण्या मागील कारण ‘मानधन’ असल्याचं म्हटलं आहे. दिशाला आपल्या मनासारखं मानधन मिळत नसल्यानं ती मालिकेत परतत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार दिशा मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 1.25 लाख रुपये इतकं मानधन घेत होती. त्यांनतर तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे तिनं काही दिवसांची विश्रांती घेतली होती. आता मालिकेत परतण्यासाठी दिशाला प्रत्येक भागासाठी 1.50 लाख रुपये इतकं मानधन हवं आहे. त्याचबरोबर तिला कामाच्या वेळेत सुद्धा थोडी मुभा हवी आहे.

दिशाच्या म्हणण्यानुसार तिला 11 ते 6 या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचं आहे. त्यांनतर तिला आपल्या मुलीला वेळ द्यायचा आहे. मात्र कलाकरांना वेळेची मर्यादा ठेवता येत नसल्याचं म्हटलं जातंय. दिशाच्या या अटी शो मेकर्सनां अजून मान्य नाहीत. त्यामुळे दिशा मालिकेत परतलेली नाही. अजूनही शोमेकर्स कडून कोणताचं खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिशा मालिकेत परतणार की नाही याबद्दल अजूनही काहीचं स्पष्ट नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *