दिशा पटानीच्या बिकिनी फोटोंची जोरदार चर्चा; टायगर श्रॉफच्या आईने केली अशी कमेंट

मनोरंजन

दिशाच्या हॉट आणि बोल्ड फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. एकीकडे दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर पारंपरिक पोशाखात फोटो पोस्ट करत असताना दिशाने मात्र बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत. दिशा सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. दिशाच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.

या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनीसुद्धा दिशाच्या फोटोवर कमेंट केली आहे. ‘वाह दिशू’ म्हणत त्यांनी तिच्या फोटोंची स्तुती केली आहे. मालदिवमध्ये दिशासोबत टायगर श्रॉफसुद्धा आहे. मालदिवसाठी रवाना होताना या दोघांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं होतं.दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असून दोघांनीही अद्याप खुलेपणाने त्याची कबुली दिली नाही. ‘बागी २’ या चित्रपटात हे दोघं एकत्र झळकले होते. दिशाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती नुकतीच ‘मलंग’ या चित्रपटात झळकली होती. ती लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *