शहा पंपावर ३५०० लिटर डिझेल चोरी

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

कामती ( प्रतिनिधी )
मोहोळ तालुक्यातील मौजे तरटगाव शिवारातील शहा हंसराज जीवन या पपंपावरील डिझेल पंपाच्या टाकीमधुन सुमारे ३५००  लिटर डिझेल त्याची एकूण किंमत २ लाख ९२ हजार ३९० रुपयांची डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने भागातील पंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूर ते मंगळवेढा रोड वरील शहा हंसराज जीवन या पेट्रोल पंपाची टाकी मधील सुमारे ३५०० लिटर डिझेल वार गुरवार दि.११ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:३० ते ६:०० दरम्यान चोरी झाली आहे. यावेळी पंपावरती श्रीकांत मल्हारी मोटे रा. शिंगोली तसेच मधुकर सोपान मोटे रा. कामती खुर्द हे कामगार कामावरती हजर होते.
सदर प्रकरण हे पंपावरील कामगार हे डिझेल पंपाचे टाकीमध्ये डी.पी. राॅड टाकण्यासाठी गेले असता डिझेल टाकीला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत असल्याने सदर टाकीमध्ये डी.पी. राॅड टाकून पाहिले असता टाकीमध्ये ३५०० लिटर डिझेल कमी असल्याचे समजले अशी फिर्याद गायकवाड यांनी दिली आहे. याविषयीचा अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन माने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *