प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांकडून अटक

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया यांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची गाडीही जप्त केली आहे.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली. सीआययूचे प्रमुख सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी भागातून दिलीप छाब्रियांना अटक केली आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात दिलीप छाब्रियांची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे. छाब्रीया यांच्यावर नेमकी कोणत्या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही. मुंबई पोलिस या संदर्भात अधिक माहिती देत ​​नाहीत आणि पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस मंगळवारी पत्रकार परिषद घेतील आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती माध्यमांना देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *