नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या साखरपुड्याच्या बातमीने अनेकांना धक्काच बसला. त्याने आज सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले. धनश्री वर्मा नावाच्या एका तरुणीसोबत तो लवकरच विवाह बंधनात बांधला जाणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर धनश्री वर्माबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी युजवेंद्र याने ‘कुटुंबाच्या संमतीने आम्ही एकमेकांच्या हो म्हणत आहोत’, असं कॅप्शन देत त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते
