बापरे! ट्रकला दिलेल्या धडकेत कारचा चेंदामेंदा, क्रेनने बाहेर काढावी लागली गाडी; पाच जण जागीच ठार

0
59

ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लखनऊन राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघात कारचा चुराडा झाला. बस्ती जिल्ह्यात ही दुर्घटना घडली असून दोघेजण यातून बचावले आहेत. यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळावरील चित्र पाहिल्यानंतर हा अपघात किती भयानक होता याची कल्पना येते. कार पूर्णपणे ट्रकमध्ये घुसली होती. क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढावी लागली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त कुटुंब लखनऊ येथून झारखंडला चाललं होतं. अत्यंत वेगात असताना कारने ट्रकला धडक दिली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

“कारमध्ये एकूण सात लोक प्रवास करत होते. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहेत. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मुलगी सुरक्षित आहे, पण चालकाची प्रकृती फार गंभीर आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here