डेल्टा वेरिएंटच्या निशाण्यावर युवक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण

0
64

विषाणूच्या डेल्टा वेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. डेल्टा वेरिएंटचा संसर्ग वेगाने होत असल्याने अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. डेल्टा वेरिएंटची सर्वाधिक बाधा तरुणांना होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही हीच स्थिती असल्याचे म्हटले जात आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये १३ जुलै ते १७ जुलै दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांमध्ये ३० ते ४९ या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक होती.यातील ४५ रुग्ण हे ३० ते ४० या वयोगटातील होते. करोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी २६ टक्के प्रमाण आहे. तर, या वयोगटापेक्षाही कमी वयातील १३ जणांना आयसीयूत दाखल करण्यात आले. आयसीयूतील रुग्णांपैकी ३६ टक्के प्रमाण तरुणांचे आहे. बाधितांमध्ये तरुणांची वाढलेली संख्या लक्षात घेता अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. ४० हून अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बहुतांशीपणे पूर्ण झाले आहे. तर, तरुणांमध्ये डेल्टाची लागण अधिक होत असून आजार गंभीर होत असल्याचे तज्ञांनी म्हटले.मागील वर्षी करोना संसर्गाची लागण वृद्धांना मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ही बाब अन्य संसर्गजन्य आजाराबाबत सत्य ठरताना दिसते. मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका समिक्षेनुसार वाढत्या वयानुसार, मृ्त्यूदरात अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलिया आणि काही परदेशी देशांमध्ये करोनाबाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.ऑस्ट्रेलियात महासाथ सुरू झाल्यानंतर नोंदवण्यात आलेल्या करोनाबाधितांच्या प्रकरणात वय २० ते २९ या वयोगटातील बाधितांचे प्रमाण २२ टक्के आहे. तर, रिपोर्टनुसार, न्यू साऊथ वेल्समध्ये गुरुवारी नोंदवण्यात आलेल्या नवीन प्रकरणांपैकी ६७ टक्के प्रकरणे ४० पेक्षा कमी वयोगटातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here