दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणास मारहाण

0
43
सोलापूर : दारू साठी पैसे दिले नाही म्हणून तरुण अस लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि.३ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुकुंद नगर भवानी पेठ सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अंकेत महेश ओव्हाळ (वय-१७,रा.मुकुंदनगर,भवानी पेठ,सोलापूर) यांने जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून अभी कोष्टी (रा.सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी अंकेत हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाथरूम साठी सार्वजनिक शौचालय येथे जात होता. त्यावेळी अभी कोष्टी फिर्यादी याला दारू पिण्यास पैसे दे असे म्हणाला.त्यावेळी फिर्यादी याने माझ्याकडे पैसे नाही मी तुला दारू पिण्यासाठी पैसे देऊ शकत नाही असे म्हणाला असता,वरील संशयित आरोपी अभि याने अकेंत याला खाली पडलेल्या लाकडी बांबूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,घटनेचा तपास पोलिस नाईक कटके हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here