सोलापूर :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण पोलीसांच्या जाळ्यात

क्राईम सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) : शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत चारचाकीतून (एमएच-१३, एसी-०७३९) फिरणाऱ्या सहाजणांना सदर बझार पोलिसांनी अटक केली.सात रस्ता चौकातून जगदंबा चौकमार्गे नळबझार चौकातून पळून जाण्याच्या तयारीत असलेली गाडी पोलिसांनी पकडली.त्यावेळी वाहनातून चार तलवारी,मोठा कोयता,सुरा,लोखंडी पाईप, केबल,मिरची पूड,पेट्रोल बाटली,काडीपेटी पोलिसांनी ताब्यात घेतली.सदर बझार पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास संगमेश्‍वर कॉलेजजवळ पोलिसांनी सापळा रचला.थोड्याच वेळात जुना एम्प्लॉयमेंट चौकातून सात रस्ता चौकाकडे भरधाव वेगाने येणारी चारचाकी पोलिसांना दिसली.ते वाहन अडविण्याचा प्रयत्न केला,मात्र वाहन तिथून निघून गेले.पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन नळबझार चौक परिसरात पकडली.दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यामध्ये आकाश मधुकर दर्जी (रा. लहान इरण्णा वस्ती),अक्षय गणेश कलबुर्गी व रोहन विजय मैनावाले (रा.मच्छी गल्ली, बेडर पूल), रोहन शशिकांत गायकवाड (रा.जामा मस्जीदजवळ, लिमयेवाडी),विठ्ठल रत्नसिंग फटफटवाले (रा. सिध्दार्थ चौक) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्या पथकाने केली.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *