दही खाऊन घटवा आपलं अतिरिक्त वजन! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

0
60

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरातला एक अविभाज्य पदार्थ म्हणजे ‘दही’. आपण सर्वच जण जाणतो कि, या पदार्थाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. म्हणूनच आपल्या जेवणात बहुतांश वेळा दह्याचा समावेश असतोच. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिनं, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी ६ आणि व्हिटामिन बी१२ या घटकांचं प्रमाण मुबलक असतं. दह्याच्या सेवनानं आपल्या शरीराला थंडावा मिळतो, पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते, पोटाचे विकार नाहीसे होतात, दात आणि हाडं मजबूत होतात. इतकंच नव्हे तर दह्यामुळे सौंदर्यविषयक समस्याही दूर होतात. अगदी केसातील कोंडा कमी करण्यापासून त्वचा मुलायम करण्यापर्यंत अनेक कारणासाठी दह्याचा वापर केला जातो. मग आहेत कि नाही अनेक फायदे? मात्र, आज आम्ही तुम्हाला दह्याच्या आणखी एका मोठ्या फायद्याविषयी माहिती देणार आहोत. दह्याचे सेवनाने  वजन घटवण्यास मदत होते. विश्वास बसत नाही? या विषयीचा अभ्यास काय सांगतो? जाणून घेऊया

वजन घटवण्यासाठी कशी होते दह्याची मदत?

  • दही हा कॅल्शियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. दही आपल्या शरीराचा बीएमआय योग्य प्रमाणात ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे, अतिरिक्त वजन घटवण्यात तुम्हाला निश्चितच मदत होईल.
  • वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात विशेषत्वाने प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला जातो. दही हा पदार्थ लो कार्ब आणि उच्च प्रथिनेयुक्त आहे.
  • दह्यातील या घटकांमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. दह्यामधील प्रथिनं आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी मदत करतात.
  • वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिझम अर्थात शरीराची चयापचय क्षमता वाढणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आपली पचनक्रिया आणि चयापचय क्षमता वाढवतं.
  • दह्यासोबत तुम्ही पोषक आहारही घेणं आवश्यक आहे. योग्य आहारासह दह्याचं सेवन केल्याने शरीरातील उत्साह कायम राहील.

रोजच्या जेवणात दह्याचा समावेश कसा कराल?

  • तुम्ही दुपारच्या/रात्रीच्या जेवणासोबत एक वाटी दही खाऊ शकता.
  • तुमच्या ब्रेकफास्टमध्ये स्मूदीच्या स्वरूपात देखील दह्याचा समावेश करू शकता.
  • फळं/भाज्यांच्या रायत्यामध्ये समावेश करा.
  • दह्यामध्ये साखर घालण्यापेक्षा, साधं किंवा मसाला दही खाणं अधिक उपयुक्त ठरेल. कारण साखर मिसळल्याने अतिरिक्त कॅलरीज देखील वाढतात. त्यामुळे दही खाण्याचा मूळ हेतू बाजूला पडतो.
  • तसेच उन्हाळ्यात स्वत: च्या शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी लस्सी/ताकासारखे उत्तम पर्याय आहेतच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here