केस वापस ले नही तो तुझे जिंदा नही छोडूंगा असे म्हणून घरावर केली दगडफेक सात जणांवर गुन्हा

0
80
सोलापूर : कोर्ट केस वापसले नही तो तुझे जिंदा नही छोडूंगा असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून घरावर दगडफेक केल्याची घटना दि.३ जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काळातील चाळ सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी हाजी मुस्ताक अहमद बाशामिया शेख (वय-५२,रा.काडादी चाळ,सिद्धेश्वर पेठ,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यांच्या फिर्यादीवरून इरफान अल्लाबक्ष शेख, इम्रान अल्लाबक्ष शेख,आली असलम शेख,आरिफ शेख,शोएब शेख,शमा शेख,जबीन शेख (सर्व.रा. काळ काडादी चाळ,सिद्धेश्वर पेठ,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा व त्यांचा मित्र असे फिर्यादीच्या घराजवळ उभे होते.त्यावेळी वरील संशयित आरोपींनी संगणमत करून एकत्र जमा जमविला.त्यानंतर आरोपी इरफान शेख याने तेरी वजहसे यह जगह अटक गई है,तुने यह जगह के बारे मे कीई हुई कोर्ट केस वापस ले, नही तो  तेरे घर को जिंदा नही छोडूंगा असे म्हणून आरोपींनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरावर दगडफेक केली.त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोरील लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा फोडले तसेच चारचाकी वाहनाची काच फोडून सहा हजार रुपयांचे नुकसान केले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई लिगाडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here