मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, सरकारला दिला गंभीर इशारा

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

औरंगाबाद : राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. अशात आता मराठा आरक्षणा पाठोपाठ धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही धनगर समाजानेही मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारला गंभीर इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद धनगर आरक्षण विभागीय बैठकीत आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. धनगर आरक्षण प्रश्न तात्काळ सोडावा अन्यथा मंत्रालयामध्ये आणि मंत्र्यांच्या घरात मेंढर घुसणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता पेटताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *