दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी आरोपी पोलीस पळाला तर एक पोलीस अटक

Uncategorized ताज्या घडामोडी सोलापूर

एक पोलीस अटक ,विजापूर नाका पोलीस ठाण्यातील घटना
सोलापूर,(प्रतिनिधी ):- येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल झाला असून एक पोलीस अटक तर दुसरा पोलीस पोलीस ठाण्यातून पळून गेला.  ही घटना घडली गुरुवार दि.20 ऑगस्ट रोजी घडली.
पोलीस हवालदार जयप्रकाश चंद्रशा कांबळे असे अटक झालेल्या पोलिसांचे नाव आहे तर पोलीस नाईक किर्तीराज शाहूराज अडगळे असे पळून गेलेल्या आरोपी पोलिसांचे नाव आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, सोरेगाव परिसरात म्हंतपा कलशेट्टी यांची शेत जमीन आहे.त्यांच्या शेजारी रामरेड्डी यांची शेत जमीन आहे या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याचे पाहून 5 ते 6 जण शेतात जाऊन अतिक्रमण काढत होते त्यावेळी म्हंतप्पा  कलशेट्टी यांची भिंत पडली आणि कामगरकडील मोबाईल काढून घेतल्याने राम रेड्डीसह 10 ते 12 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला त्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्याकडे असून ते तपास करताना त्या घटनेच्या वेळी पोलीस हवालदार कांबळे आणि अडगळे या दोघांचे मोबाईल वर आरोपीचे फोन आल्याचे उघड झाले त्यावरून दरोड्याच्या गुन्ह्यात या दोघा पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले.त्यावरून दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये हवालदार कंबलेला अटक करण्यात आली तर पोलीस नाईक किर्तीराज अडगळे याला अटक करताना लघवी लागल्याचा बहाणा करून त्याने पोलीस ठाण्यातून पळ काढला म्हणून त्याच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे याांनी फिर्याद दिली. पुुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बेंबडे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *