वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागला गॅस सिलेंडर

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती 644 रुपयांवरून वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाल्या होत्या. आता विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नसून कमर्शिअल  गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas Cylinder Price) किमतीत 91 रुपयांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कमर्शिल गॅस उपभोक्त्याना सिलेंडर 1290 रुपये किंमतीला मिळत होता, डिसेंबरमध्ये हे दर 91 रुपयांनी वाढून 1381.50 रुपये झाले आहेत.

काय आहेत नवे दर (LPG Price in India 01 January 2021)

देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसी (IOC) च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या किंमतीनुसार दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 17  रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 1332 रुपयांचा सिलेंडर 1340 रुपये झाला आहे. मुबंई आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अनुक्रमे 1297.50 रुपये आणि 1463.50 रुपये आहे. या दोन्ही शहरात 17 रुपयांची वाढ झाली आहे.

कोलकातामध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 22.50  रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 1,387.50 रुपयांचा सिलेंडर 1,410  रुपये झाला आहे. कोलकातामध्ये घरगुती गॅसच्या किमती  720.50 रुपये  आहेत.

सबसिडी रद्द

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील किंमती सबसिडी देखील बंद केली आहे. सारकरडून घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद केल्यामुळे सामान्यांना दुहेरी फटका मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *