मोहोळ येथील दुहेरी खून प्रकरणातील फरार पाच आरोपी अटकेत

0
224
मोहोळ पोलिसांची कारवाई
जनसत्य प्रतिनिधी
मोहोळ : शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालुन दोघाजनांचा खुन केल्या प्रकरणी गेली १५ दिवस फरार असलेले पाच आरोपी पकडण्यात मोहोळ पोलीसाना यश आले असून त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आळंद तालुक्यातील
हिरोली, सरकांबा गावातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
या बाबत पोलीसाकडुन मिळालेल्या माहीती नुसार, १४ जुलै रोजी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे व रमेश उर्फ गोटू सरवदे यांच्यासह चालक भैय्या असवले अशा सहा जणांनी कट रचून शिवसैनिक सतीश क्षिरसागर व विजय सरवदे यांच्या अंगावर टेम्पो घालून दोघांचा खुन केल्या प्रकरणी वरिल सहा जनांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी टेम्पो चालक भैया असवले याला १५ जुलै रोजी मोहोळ पोलीसानी अटक केली होती. तर या गुन्हयातील संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे व रमेश उर्फ गोटू सरवदे या पाच जणांना कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील हिरोळी गावच्या भाग्यंवंती मंदिर आवारातून गोपनीय माहितीच्या आधारे खबर मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीम मधील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे, हेड पोलीस कॉन्स्टेबल शरद ढावरे, पांडुरंग जगताप, गणेश दळवी, हरिदास थोरात यांची टीम दोन जुलै रोजी दुपारी रवाना झाली. साध्या वेशात असणाऱ्या या टीमने कर्नाटकातील हिरोली गावच्या भाग्यवती मंदिराच्या परिसरात सायंकाळी पोहोचल्यानंतर मंदिराच्या परिसरात वावरणाऱ्या या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रात्री उशिरा मोहोळ पोलिस ठाण्यात आणून अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here