दगडाने ठेचून केली वृद्धेची हत्या; गावाबाहेर नेऊन पुरले, पण कुत्र्यांनी केला भांडाफोड

क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्र

हिंगोली : हिंगोली तालुक्यामध्ये एका वृद्धेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञाताने या महिलेची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह गावाबाहेर नेऊन पुरलं, पण तरीही या प्रकरणाचा भांडाफोड झाला तो कुत्र्यामुळे. सेनगाव तालुक्यात असलेल्या साखरा याठिकाणी हा प्रकार घडला आहे.

साखरा या गावामध्ये भारजाबाई मारोती इंगळे ही 85 वर्षांची वृद्ध महिला राहत होती. या महिलेला चार मुलं आहेत. ही मुलंदेखिल गावातच राहतात, पण ते सर्व वेगळ्या ठिकाणी राहतात. ही महिला घरामध्ये एकटी असताना शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्ती या महिलेच्या घरात शिरली. त्यानंतर या महिलेची दगडाने तोंडावर वार करत ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर भारजाबाई यांचा मृतदेह गावापासून बाहेर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साखर तांडा घाटात एका खड्ड्यात टाकून पुरण्यात आला.

हा सर्व प्रकार पहाटे घडला. त्यावेळी या परिसरातील कुत्र्यांना चाहूल लागल्याने आणि आवाज येत असल्याने कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली होती. सर्वच कुत्री एकाच बाजूला भुंकत असल्याचं पाहून या भागातील शेतकऱ्यांना संशय आला. त्यामुळं कुत्री भुंकत आसलेल्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी पाहणी केली. या ठिकाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना एक खड्डा बुजवल्याचे दिसून आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गावातील लोकांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं. पोलिसांचं पथक याठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी खड्डा उकरून पाहिलं असता, त्यांना मृतदेह दिसला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी श्वान पथक पाचारण करून तपास केला. घरात काही पुरावे मिळतात या याचाही पोलिसांनी तपास केला. तसंच गावातील सीसीटिव्ही असलेल्या दुकानांचे फुटेज तपासून गावात कोणत्या गाड्या आल्या किंवा गेल्या याचाही तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *