जागेच्या कारणातून सख्ख्या भावाचा खून सख्ख्या भावासह दोघांना अटक

ताज्या घडामोडी सोलापूर


सोलापूर (प्रतिनिधी)

कुमठा नाका परिसरातील कल्लप्पा म्हेत्रे नगरात जागेच्या कारणातून सख्ख्या भावाचा खून करण्यात आला.याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मारेकरी सखा भाऊ आणि त्याचा साथीदार अशा दोघांना अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती.     याबाबत सुनिता कुंभार यांनी फिर्याद दिली.त्यावरुन भिमराव कुंभार व संजय बनसोडे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी भिमराव आणि जखमी महेश संगप्‍पा कुंभार हे सख्खे भाऊ होते.कुमठा नाका परिसरातील जागेवरुन त्यांच्यात वाद झाला होता.यातून आरोपी भिमराव हा महेशवर चिडून होता.दरम्यान,शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने महेश सोबत वाद घातला.त्याला घराच्या बाहेर बोलावून घेतले.त्यानंतर लोखंडी रोडने डोक्यात मारले. यात महेश गंभीर झाला.त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान महेश मृत्यू पावला.या गुन्ह्याचा खुनी हल्ला अशी नोंद झाली होती.यात वाढ करण्यात आली असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केले.न्यायालयाने ३० मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास सपोनि पेटकर करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *