कुंटणखान्यावर छापा, दोन पीडितांची सुटका

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी)  एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गवळी वस्ती जवळील बाबुराव नगर येथे कुंटणखाना चालू असल्याची माहिती शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बाबुराव नगरात छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली.या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर लगेच बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खात्री करून घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंटणखान्यावर छापा टाकून शबाना सत्तार शेख (वय-४६, रा. कुमठा नाका, हुडको कॉलनी अहिल्याबाई होळकर शाळेजवळ) आणि हिनाकौसार मौलाली शेख ( वय-२६, रा. गवळी वस्ती, बाबुराव नगर) या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, प्रशांत क्षिरसागर, राजेंद्र बंडगर, सुवर्णा काळे, महादेव बंडगर, गवळी, इनामदार आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *