माढ्यात साडेसात लाखाची मोठी चोरी

ताज्या घडामोडी सोलापूर

माढा/ तालुका प्रतिनिधी 
    माढा दिवाणी न्यायालयाशेजारील अमरदीप भांगे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे चार सशस्त्र चोरट्यांनी सात लाख ६१ हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची मोठी चोरी केली.
    याबाबत अमृता प्रशांत जगताप यांनी माढा पोलिसात तक्रार दाखल केली असून शुक्रवारी पहाटे तीन च्या सुमारास जीन्याचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत घरातील हाॅलमध्ये झोपलेल्या अमृता जगताप, अरूणा भांगे यांना चाकूचा धाक दाखवून घरातील बेडरूमध्ये झोपलेल्या अमरदीप भांगे यांच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. व घरातील कपाटातून सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गंठण, लाॅकेट अंगठ्या, कर्णफुले असा ऐवज चोरून नेला. जाताना  घरातील सर्व मोबाईल घेऊन जाताना घराचे सर्व दरवाजे बाहेरून बंद करून घेत पोबारा केला. 
सकाळी दरवाजे उघडल्यानंतर माढा पोलिसात खबर दिली त्यावेळी  पोलिस निरीक्षक अमूल कदबाने सहायक पोलिस निरीक्षक  किरण घोंगडे यांच्यासह पोलिस हवालदार घोळवे, पोरे,देशमुख, शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिस उपाधिक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी अकरा वाजता सोलापूरहून श्वान पथक श्वान डाॅलीसह घटनास्थळी पोहोचले. घरातून इंदीरानगरकडील बाजूने शेतातून दिवाणी न्यायालयातील झेराॅक्स सेंटरपर्यंत जाऊन घुटमळले.ठसेतज्ञांनी घरातील ठसे घेऊन तपासणीस दिले आहेत. 
     या महिन्यात मोटारसायकल चोर्या वाढल्या असताना न्यायालयाजवळच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेली मोठी घरफोडी पोलिसांना आव्हान देणारी ठरली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमूल कदबाने करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *