नगरपालिकेच्या जागेतील बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; दीड लाखाची वाहने आणि हजारांची जनावरे पकडली

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

तब्बल १९ जणांना अटक पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची आणि बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून तब्बल१९ आरोपींना ताब्यात घेऊन दीड लाखाची वाहने व ३६ हजारांची जनावरे जप्त केली आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर आणि बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने केली आहेसविस्तर माहिती अशी की,बार्शी धस पिंपळगाव रोडवरील जुना कचरा डेपोच्या ठिकाणी बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी गाई आणि रेडा आणला असल्याची माहिती बतमीदारा मार्फत मिळाली होती त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक आणि बार्शी पोलिसांनी आज पहाटे पाच वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी कट्टलसाठी आणलेले दोन मोठ्या जर्सी गाई दोन लहान गाई व एक रेडा मिळून आला तर त्या वेळी तब्बल १९ जण मिळून आले यामध्ये १) मोहम्मद गणी सौदागर वय ४२ २) ताहीर बाबूलाल  सौदागर वय ३३ ३) इब्राहिम आरिफ सौदागर वय ४९ ४) मुनाफ वारीस सौदागर वय ३०  ५) जमील मुकसुद सौदागर ६) जुलफेकार सिकंदर सौदागर वय २३ ७) फैयाज गौस कुरेशी  वय २७ ८)मुद्दीण सत्तार सौदागर वय ४२ वर्षे ९) शहाबाज कदिर सौदागर वय २५ १०) मोहद्दीन मुस्ता क सौदागर वय ३५  ११) जैद मुनाफ शेख वय १९ १२) गफ्फार सत्तार सौदागर वय ५२ १३) महारुफ मोहम्मद सौदागर वय २२ १४) सद्दाम रियाज सौदागर वय २३ १५) फैज वहाब सौदागर वय १८ १६) नवाज जमील सौदागर वय १८ १७) नशीद फकीर  सौदागर वय ३५ १८) रियाज सौदागर वय २७ रा सर्व मंगळवार पेठ बारंगूळे गल्ली बार्शी यांनी वरील जनावरे कत्तलीसाठी आणल्या असल्याचे सांगितले तसेच सदरची सर्व जनावरे रमजान सौदागर याने आणल्या असून आम्ही सर्वजण त्याच्याकडे कामाला असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे यामध्ये पोलिसांना तब्बल ८ मोटरसायकल पाच जनावरे आणि कत्तलीसाठी लागणारे साहित्य मिळून आले आहे हे सर्व जप्त करण्यात आले असून जनावरे बार्शीतील गोरक्षण मंडळाकडे सोपविण्यात आली आहेत  तर सदर ठिकाणी उभा असलेला पांढऱ्या रंगाचा टेम्पो एम एच १२ जी टी  ८२५० हा टेम्पो पोलिसांची नजर चुकवून ड्रायव्हर टेम्पो घेऊन पळून गेला आहे त्याचा शोध सुरू आहे याबाबत पटवा यांच्या फिर्यादीवरून  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ए एस आय सुधाकर ठाकर करत आहेत
……………………………………….

 चक्क नगरपालिकेच्या जागेतच हा बेकायदेशीर कत्तलखाना अगदी राजरोसपणे सुरू असताना नगरपालिके कडून आतापर्यंत कधीही का कारवाई करण्यात येत नव्हती ? हा संशोधनाचा विषय बनला असून आजच्या कारवाई मुळे बार्शी  नगरपालिका कामकाजाच्या पारदर्शकता बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच याबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत* सदर कत्तलखान्याच्या बाबतीत दैनिक जनसत्यने वस्तुनिष्ठ आणि फोटोसह वृत्तमालिका प्रकाशित करून कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता

……………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *