प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, घरात एकटी असल्याची संधी साधत धारदार शस्त्राने केले वार

क्राईम ताज्या घडामोडी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातअसलेल्या रामपूर गावामध्ये एका तरुणीच्या हत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. तरुणी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने घरात घुसत तिच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार केले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा परिसरात आहे. खंडाळा पोलिसांनी या घटनेनंतर संशयित आरोपीला अटक केली आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं सर्वत्र शांतता असताना यवतमाळच्या पुसद तालुक्यात खुनामुळं खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका 21 वर्षीय तरुणीची एका तरुणानं हत्या केली आहे. रामपूरमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं नाव सुवर्णा असं आहे. सुवर्णाचे आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळं सुवर्णा ही घरी एकटीच होती. त्याचाच फायदा घेत आकाश आडे हा तरुण तिच्या घरात शिरला. आकाशनं सुवर्णावर धारदार शस्त्रानं एकापाठोपाठ एक सपासप अनेक वार केले. या हल्ल्यामुळं सुवर्णाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुवर्णावर झालेल्या हल्ल्याची खबर अगदी वेगात गावामध्ये पसरली. त्यामुळं काही वेळातच याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळं परिसरात प्रचंड खळबळ पसरली आहे. सुवर्णा हिची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा या घटनेनंतर परिसरात पसरली आहे. खंडाळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आकाश आडे या तरुणाला अटक केली असून, घटनेबाबत तपास सुरू आहे.

ही हत्या प्रेम प्रकरणातून झालेली असल्याची चर्चा असली तरी त्यामागचे नेमके कारण काय. तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला का, याचा शोध पोलीस तपासाच्या माध्यमातून घेतला जात आहे. मात्र सगळीकडं शांतता पसरलेली असताना घडलेल्या या घटनेमुळं परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *