मित्राच्या पत्नीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध; पीडितेला धमकावून 8 लाख रुपयेही उकळले

क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्र

बीड : बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. एका मित्राच्या पत्नीवरसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर आरोपीने पीडित महिलेला धमकावत तिच्याकडून लाखो रुपयेही हडपले असल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 33 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासोबत राहते. त्यांच्याघरी पतीचा मित्र नेहमीच येत असे. पतीच्या मित्राने ओळख झाल्यावर या महिलेचा गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने पीडित महिलेकडून 8 लाख रुपये आणि इतर सोन्याच्या वस्तूही घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

शारीरिक संबंधांबाबत आणि पैशांच्या व्यवहाराबाबत जर कुणाला काही सांगितलं तर जीवे मारुन टाकेल अशी धमकी सुद्धा आरोपी पीडित महिलेला देत होता. यामुळे पीडित महिला गप्प बसली होती. पण 7 एप्रिल रोजी पीडित महिलेने या सर्वांला कंटाळून आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार केली.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने जुलै 2018 पासून ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यासोबतच साडे आठ लाख रुपये सुद्धा हडपले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन बाबूराव मुंडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.

पीडित महिलेने ज्यावेळी आरोपी अर्जुन मुंडे याच्याकडे पैशांची मागणी केली त्यावेळी त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तसेच माहाण केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात जबरदस्ती शारीरिक संभोग करणे, फसवूक करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *