सावळेश्वर येथे मुद्देमाल चोरून नेला

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
विकेंड लॉकडाऊन मध्ये बंद ठेवलेल्या एका नाष्टा सेंटर चे पत्र्याचे शेड पाठीमागील बाजूनी उचकटून आतील फ्रीज, मिक्सर, थर्मास, रोख रक्कम, व थंड पेय च्या बाटल्या असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.९ एप्रिल ते १२ एप्रिल च्या दरम्यान सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत सावळेश्वर येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सावळेश्वर येथील गणेश रामू पवार यांचे सोलापूर- पुणे महामार्गावर सावळेश्वर नाष्टा व टी कॉर्नर चे कँटीन आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन मुळे शासकीय नियम पाळीत दि. दि. ९ एप्रिल ला रात्री आठ ते १२ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत पर्यंत कँटीन बंद ठेवले होते. दरम्यान १२ एप्रिल ला सकाळी ७ वाजता जाऊन कँटीन पाहिले असता पाठीमागील बाजूंनी पत्रे कोणत्यातरी साहित्याने उचकटून आत प्रवेश करून फ्रीज, मिक्सर, थर्मास,  थंड पेय च्या बाटल्या व रोख रक्कम अडीच हजार रुपये असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.९ एप्रिल ते १२ एप्रिल च्या दरम्यान घडली असल्याची फिर्याद गणेश रामू पवार यांनी दिली असून पुढील तपास पोलीस सुनील चवरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *