सोलापूर (प्रतिनिधी) साडी देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची फसवणूक केल्याची घटना दि.२६ डिसेंबर रोजी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पानगल हायस्कूल येथील के.एस.सी अपारमेंट गेटच्या समोर घडली.याप्रकरणी एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी अंबाबाई मल्लिकार्जुन गबारे (वय-६५,रा. मुस्लिम पाच्छा पेठ,सोलापूर) यांना एका अनोळखी इस्माने में दुबई मे काम करता हु,मेरे पास बहुत पैसा है मेरे बेटे की शादी मे साडी और पैसे बाट रहा हू आज मैने सुबह से तीन लाख रुपये बाटे है.आप गरीब है इसलिये मै आपको मदत कर रहा हु असे म्हणून फिर्यादी अंबूबाई गबारे विश्वास संपादन केला.त्यानंतर अंगावरील सोने काढून द्या व तुमच्या गळ्यातील सोने गहाण ठेवले आहे असे साड्या देणाऱ्या व्यक्तीला सांगा असे म्हणाला.तसेच रुमाल मध्ये दहा हजार रुपये आहेत नीट ठेवा असे म्हणून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची मणी असलेली माळ आणि कानातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुले काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.तसेच या घटनेने मधील दुसरी व्यक्ती नागरबाई हरी रणदिवे (वय-६५,रा. पांढरे वस्ती,जुना कारंबा नाका,सोलापूर) या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजापूर वेस येथून उर्दू शाळेजवळून पेंटर चौकाकडे पायी चालत ढाळे विक्री करत होत्या.त्यावेळी एक इसम त्यांना म्हणाला की, ढाळेवाली मौसी तुम रुको तुम्हारे जैसे गरीब लोगों को एक लडकी मोफत साडी बाट रही है,तो आप आपके गले का सोना मेरे पास दो नही तो उनको लगेगा की तुम पैसे वाले लोग है,तुम्हे साडी नही देंगे असे म्हणून विश्वास संपादन करून उर्दू शाळेच्या एका बोळात नेऊन तिच्याकडील गळ्यातील सोन्याची माळ काढून घेतली.या घटनेत सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले,बारा हजार रुपये किमतीची सोन्याची मनी असलेली माळ, बारा हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची मनी असलेली माळ असे मिळून एकूण तीस हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन त्या दोन्ही महिलांची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर हे करीत आहेत.
