मोहोळ येथे दि. २३ पासून “प्रथम नगराध्यक्ष चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

ताज्या घडामोडी सोलापूर


जनसत्य, प्रतिनिधी

 मोहोळ.
वन मॅन शो स्पोर्टस अकॅडमी मोहोळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “प्रथम नगराध्यक्ष चषक” मोहोळ क्रिकेट लीग २०२१ चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन दि.२३ जानेवारी रोजी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती संयोजक नगरसेवक अतुल क्षीरसागर यांनी दिली.
मोहोळ येथील वन मॅन शो स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत युवकांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा या उद्देशातून प्रत्येक वर्षी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “प्रथम नगराध्यक्ष चषक” आयोजन केले असून याचे उदघाटन दि. २३ जानेवारी रोजी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख हे असणार आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष शौकत तलफदार, युवा नेते चैतन्य देशमुख, नगरसेवक सुशीलभैया क्षिरसागर, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, युवा नेते श्रीकांत गाढवे, युवा नेते तन्वीर शेख, उद्योजक माजिद शेख, उद्योजक सचिन शास्त्री, टायगर ग्रुपचे अध्यक्ष मलिक जाधव, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिंटू शेगर, उद्योजक सागर शेख, जितेंद्र अष्टुळ, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण घोडके, किशोर वस्त्रे, आनंद गायकवाड,  संदीप सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी वन मॅन शो स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष धनंजय माने, सचिव आबा कांबळे, मुन्ना टेळे, सागर अष्टुळ, सोमनाथ भालेराव, शीलवंत क्षिरसागर, सुलतान पटेल, बाळासाहेब माळी, शुभम उंबरे, रवी थोरात, विजय लवटे, आकाश सिताप आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *