कोरोना लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामारीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाचीही जोरात तयारी सुरु झाली आहे. अद्याप देशात कुठल्या कंपनीला हिरवा कंदील मिळालेला नसला तरी सरकारी यंत्रणा लसीच्या वेगानं पुरवठ्यासाठी सज्ज होतं आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन 23 मंत्रालयं एकत्रितपणे मोहीम राबवणार आहे. 29 हजार कोल्ड चेन पॉईंटस 70 हजार वॉक इन फ्रीजर्स ही तयारी आहे.

देशातल्या लसीकरणाच्या मोहीमेची

निवडणुकीच्या कार्यक्रमाला जशी तयारी असते तशा पद्धतीनं देशात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे असं पंतप्रधान मोदी म्हणत आले आहेत. त्याच धर्तीवर लसीकरणाचा हा प्लॅन तयार होत आहे. केंद्रीय पातळीवरुन ते अगदी स्थानिक पातळीपर्यंत सर्व स्तरावरच्या यंत्रणा त्यासाठी सज्ज केल्या जात आहेत. काल दिल्लीतल्या आरोग्य मंत्रालयानं त्यासंदर्भात एक सविस्तवर नियमावली जाहीर केली.

कशी असणार आहे लसीकरणाची तयारी?

  • 23 मंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे काही विभाग यांच्यावर अंमलबजावणीची तयारी
  • लसीकरण करणारे, कोल्ड चेन हॅडल करणारे, डाटा गोळा करणारे, आशा वर्कर्स अशा सर्वांचं ट्रेनिंग सुरु आहे.
  • प्रत्येक सेशनमध्ये एका बुथवर दिवसाला 100 ते 200 जणांचं लसीकरण केलं जाईल.
  • लसीकरणानंतर त्या व्यक्तीला 30 मिनिटे निरीक्षणासाठी ठेवलं जाईल.
  • लसीकरणासाठी को-विड अॅपवरुनच सगळी माहिती उपलब्ध होणार आहे, हे अॅप डाऊनलोड करणं अत्यावश्यक असेल.

देशात लस निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कुठल्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार हे अद्याप निश्चित नाही. पण फायझर, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक, झायडस कॅडिला या कंपन्या लसीच्या निर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी ही लस उपलब्ध होईल त्यावेळी तिच्या पुरवठ्यासाठी तातडीनं तयार असावं यासाठी सरकारी यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *