COVID : राज्यात दिवसभरात 391 जणांचा मृत्यू, 22 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नव्या रूग्णांची वाढ कायमच आहे. शनिवारी दिवसभरात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

राज्यात दिवसभरात 13 हजार 489  रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.81 एवढा झाला आहे. राज्यात सध्या  2,79,768 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे.त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.कोरोनाची प्रसार आता ग्रामीण भागात झाल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतांनाच आता कोरोनाची भीती कमी होत आहे. त्यामुळे लोक जास्त बेफिकीर झाल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *