एसआरपीएफ पोलीस नाईकासह चार जणांना पाच वर्षे सक्तमजुरी

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी)

पैशाची मागणी करुन हाडांपासून पावडर तयार करणार्‍या कंपनीला आग लावणार्‍या एसआरपीएफ जवानांसह चार जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि.जी.मोहिते यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.        मल्लय्या उर्फ सचिन बसय्या स्वामी (वय-३५) सचिन महारुद्र बडुरे (वय-३४), रमेश अप्‍पाशा भिमनवरु (वय-३३) व मल्लिकार्जुन उर्फ मल्लू शिवशंकर बडुरे (वय-३१, रा.शिंगडगाव ता.द. सोलापूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव परिसरात सन केमिकल्स कंपनी आहे. कंपनीत हाडापासून पावडर तयार करण्याचे काम होते.घटनेदिवशी २ नोव्हेंबर २०१६ रोजी फिर्यादी दिगंबर ज्ञानोबा जाधव आणि शरीफ कुरेशी हे थांबले होते.त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले.त्यांनी कंपनी व तेथे चालणारे काम बेकायदेशीर आहे. येथील काम बंद करा,आम्हाला पाच हजार रुपये द्या म्हणून दमदाटी केली.आरोपींनी फिर्यादी, व कंपनीतील कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केली.त्यानंतर सोबत आणलेल्या रॉकेलच्या बाटल्यासह कंपनीत प्रवेश केला.त्यांनी तेथील हाडांच्या साठय़ावर रॉकेल ओतले.नंतर काडीने पेटवून दिले.तसेच इलेक्ट्रॉनिक जनरेटर तसेच वजन काटय़ाची मोडतोड केली.    याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले.या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.सरकारपक्षाचा युक्तीवाद,पुरावे व दोन साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरुन आरोपींना शिक्षा ठोठावली.या खटल्यात सरकारतर्फे अॅड.अहमद काझी तर आरोपीतर्फे अॅड.राजकुमार मात्रे,अॅड. उंबरजे व अॅड.गायकवाड यांनी काम पाहिले.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

..आरोपीच्या मदतीचा प्रयत्न फसला
या खटल्यात फिर्यादी,घटनास्थळ व जप्ती पंच फितुर झाला.आरोपी स्वामी यास वाचविण्यासाठी साक्षीदाराने खोटी कागदपत्रे तयार केली.घटनेदिवशी तो कामावर हजर होता असे दाखविण्याचा प्रयत्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *