कोरवली येथील ८१ वर्षाच्या आजीने केली सारी रोगावर यशस्वी मात
कामती ( प्रतिनिधी ) : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एका ८१ वर्षीय आजीने सारी या रोगावर यशस्वी मात करून सोलापूर येथील दवाखान्यातून सोमवारी कोरवली येथे घरी पोहोचल्या. दवाखान्यातून आजीची गावात आगमन होताच काही ग्रामस्थांनी त्यांचे फटाके वाजवून स्वागत केले.
मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील कामती बुद्रुक, कोरवली, कुरुल, इंचगाव आदि गावात कोरोना या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण सापडत आहेत. कोरवली येथील एक आज ८१ वर्षीय आजीला तब्येत खराब झाल्याने सोलापुरातील एका दवाखान्यात उपचारासाठी मागील पंधरा दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते. दवाखान्यात यांच्यावर उपचार सुरू असताना त्या सारी या रोगाचे पॉझिटिव निघाले होते. त्या आजीने सारी या रोगावर मात करून गावी पोहोचल्याने कांही ग्रामस्थांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.