मृतदेहाला मिठी मारून रात्रभर रडत होता छोटा भाऊ, सकाळी दोघांवर एकत्रच झाले अंत्यसंस्कार

ताज्या घडामोडी देशविदेश

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये दोन भावांमधील अमर प्रेमाची एक घटना समोर आली आहे. येथे एका भावाचं कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर जेव्हा मृतदेह घरी आणण्यात आला, तेव्हा भाऊ मृतदेहाला मिठी मारून रडत राहिला. त्यानंतर छोट्या भावाचाही मृत्यू झाला.

हमीरपूर जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून प्रत्येक जण या घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत आहे. भावाचा मृतदेह गावात येतात, दुसऱ्या भावाने आपले प्राण सोडले. त्यानंतर दोन्ही मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हमीदपूर जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. येथील खडेही लोधन निवासी रिटायर्ड शिक्षक रामगोपाल वर्मा यांना गेल्या 4 दिवसांपासून ताप आणि खोकला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. याबाबत त्यांचा छोटा भाऊ नृपत वर्मा याचा कळताच ते खूप दु:खी झाले. मोठ्या भावाच्या मृत्यू सहन न झाल्याने ते आपल्या मोठ्या भावाला मिठी मारून रडू लागले. त्यानंतर सकाळी 6 वाजता त्यांचाही मृत्यू झाला.

दोन्ही भावांवर एकत्रच अंत्यसंस्कार देण्यात आले. दुसऱ्या भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा हादराच बसला आहे. दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळे राहत होते. मात्र तरीही दोन्ही भावांचा एकमेकांवर जीव होता. जणू काही त्यांनी एकमेकांना कायम साथ देण्याचं वचनच दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *