कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; नागरिकांसाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP

ताज्या घडामोडी देशविदेश

झारखंड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम देशातील सर्वांवर होत आहे. यामुळे राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. झारखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांना बेडची सुविधा मोबाइलवर उपलब्ध होऊ शकेल. यासोबतच व्हॉट्सअॅप क्रमांकावरही डॉक्टरांचा सल्ला मिळू शकेल. मुख्यमंत्री हेमंन सोरेन यांनी राज्यात वाढणाऱ्या संसर्गादरम्यान नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमृतवाहिनी वेबसाइट, मोबाइल अॅप आणि चॅटबोटचं उद्धाटन केलं आहे.

याच्या माध्यमातून रुग्ण आता रुग्णालयात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर आयसीयू बेड ऑनलाइन बुक करू शकतात. सोबतच व्हॉट्सअॅप चॅटबोटच्या माध्यमातून डॉक्टरांशी चर्चा करीत कोरोनाशी संबंधित माहिती घेऊ शकतात. सोबतच सीएमनी लोकांना आग्रह केला आहे की, त्यांनी सर्दी, ताप याकडे दुर्लक्ष करू नये. ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. जर कोणामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी आयसोलेट व्हावं आणि लवकरात लवकर टेस्ट करून घ्यावी. यातून तुम्ही स्वत:चा जीव तर वाचवू शकालच शिवाय कुटुंबालाही सुरक्षित ठेवू शकाल.

नागरिकांनी अमृतवाहनी वेबसाइट आणि अॅपवर राज्यातील सर्व सरकार आणि खासगी रुग्णायात कोविड बेड, ऑक्सिजन बेड, आयसीटू बेड आणि व्हेंटिलेटर बेड्सच्या उपलब्धतेची रिअल टाइम माहिती द्यावी. या माध्यमातून ऑनलाइन बुकिंगची सुविधाही मिळेल.

जे कोरोनाबाधित आयसोलेशनमध्ये आहेत, ते या माध्यमातून कोरोना मेडिकल किट घेऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅटबोड नंबर 8595524447 वर डॉक्टरांच्या सल्लाने करता येऊ शकते. योसबत औषधं, डाइट चार्ट, जिल्हा कंट्रोल रुममध्ये संपर्क, प्लाजा डोनेट, होम आइसोलेशन किट संबंधित माहितीही घेऊ शकता. रुग्णालाय रेमेडेसिविर आणि अन्य औषधांची मागणी अॅपच्या माध्यमातूनही करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *