अंत्ययात्रा सामान्यांचे व व्हीआयपींचे..!

Uncategorized लेख सोलापूर

कोरोना हा विषाणू महाभयानक तर आहेच शिवाय या विषाणूने मानवाला अनेक प्रकारचे ज्ञानदान केलेले‌ आहे. हा विषाणू डोळ्यांना दिसत नसला तरी त्याने बराच धडा मानवाला दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती आहेत धर्म आहेत त्यांच्या रीतिरिवाजानुसार त्या व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात येते परंतु कोरोना या विषाणूच्या भयामुळे आज संसर्ग पसरू नये यासाठी अंतयात्रेवर मर्यादा आल्या. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अथवा महिलेचा कोरोनामुळे मृत्यू होतो तेव्हा त्या संबंधित व्यक्तीचा अथवा महिलेचा मृतदेह हे नातेवाईकांकडे न देता थेट स्मशानभूमीत नेऊन जाळले जाते इतकेच नाही तर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या त्या व्यक्तीचे शव काळया कापडामध्ये अथवा कॅरीबॅगमध्ये गुंडाळून तो मृतदेह थेट स्मशानभूमीत नेऊन जाळला जातो. या मृतदेहांची आदला बदल होतात, विटंबना होते इतकेच काय नातेवाईकांना या मृतदेहाचं जीवनाच्या शेवटच्या क्षणी तोंडही बघू दिले जात नाही इतकी वाईट अवस्था या कोरोनाने केलेली आहे. आपण वर्तमानपत्रांत बातम्या वाचतो ऐकतो की कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले, संबंधित मृतदेहाच्या नातेवाइकांकडून मृतदेह दफन करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने अधिक पैशाची मागणी केली गेली हे पाहून वाचून ऐकून माणसाचे मन विषण्ण होत आहे. कधी कधी वाटतं कि कोरोनाने मृत्युमुखी पडणारी व्यक्ती इतकी वाईट असते का की त्या व्यक्तीचा मृतदेह गुन्हा केल्यासारखे काळया कापडात बांधून ते नातेवाईकांकडे न देता थेट स्मशानभूमीत नेऊन जाळले जाते? ही झाली सामान्यांच्या अंत्ययात्रेची कथा..! परंतु आपल्या देशांमध्ये गरीब-श्रीमंत हा भेदभाव फार जुना आहे. आज आपण जर पाहिले तर एखाद्या राजकीय पक्षातील नेत्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कोरोनाची परिस्थिती असतानाही  ते शव नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाते? अंत्यदर्शन घेण्यासाठी दिवसभर मृतदेह ठेवला जातो? अंत्ययात्रेला एक नाही.. दोन नाही.. तर लाखो जणांचा जनसमुदाय गोळा होतो आणि पोलीस सरकार या घटनेवर मूग गिळून गप्प बसतात? याचा अर्थ सर्वसामान्य व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्याची अंत्ययात्रा निघत नाही, अंत्ययात्रा निघालीचं तर अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, दंडाची रक्कम वसूल केली जाते इतकेच नाही तर नातेवाईकांना मृतदेह न सोपवता थेट स्मशानभूमीत नेऊन जाळले जाते, अंत्यदर्शन तर कोणालाच दिले जात नाही आणि जी व्यक्ती व्हीआयपी असते त्या व्यक्तीची अंत्ययात्रा निघते.. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.. अंत्यसंस्काराला लाखो जणांचा जनसमुदाय जमा होतो आणि पोलीस प्रशासन सरकार या गोष्टीवर मूग गिळून गप्प बसतात. याचा अर्थ असा झाला की सामान्य व्यक्तीच्या मृत्यूला  यत्किंचितही किंमत नाही आणि व्हीआयपींच्या मृत्यूला फार मोठी किंमत आहे. सोलापुरात एका राजकीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर सध्या गुन्हे दाखल होत आहेत.. त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे.. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलमध्ये पाठवले जात आहे.. त्यांचे एरिया सील केले जात  आहेत.. मग या सर्व बाबी हिंगोलीत का घडल्या नाहीत?  तिथे तर लाखोंचा जनसमुदाय अंत्ययात्रेसाठी उपस्थित होता. तिथे कोणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत? तेथील स्थानिक प्रशासनाने कोणावरही कार्यवाही केली नाही? प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली तिथे कोणीच काही बोलले नाही. माझं म्हणणं असा आहे की जर व्हीआयपींना तुम्ही अंत्यसंस्कारासाठी परवानगी देत असाल तर ती परवानगी सर्वसामान्यांना का नाही? सर्वसामान्य व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांवरचं अन्याय का? म्हणजे सामान्य व्यक्तीचा, महिलेचा मृत्यू ही कनिष्ठ दर्जाचे आणि व्हीआयपींची मृत्यू वरिष्ठ दर्जाचे? सामान्य व्यक्तीच्या मृत्यूला काहीही किंमत नाही आणि व्हीआयपींच्या मृत्यूला किंमत आहे?  सामान्य व्यक्तीच्या अंत्ययात्रेत यांना कोरोना दिसतो परंतु व्हीआयपींच्या अंत्ययात्रेत यांना कोरोना दिसत नाही? सामान्य व्यक्तीचा अथवा महिलेचा मृतदेह नातेवाईकांना पाहूही दिले जात नाही आणि व्हीआयपींची मृतदेहाचे दर्शन घेण्यासाठी तो मृतदेह तासंतास ठेवला जातो? रांगेत उभे राहून पब्लिक त्यांचे अंत्यदर्शन घेते? हा कसला न्याय आहे? या देशांमध्ये संविधानाने सांगितलेला आहे की या देशातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे आणि इथे सर्वांना समान अधिकार आहे मग दोन अंत्यसंस्कार तील हे फरक मानवजातीला अत्यंत मारक आहेत. मानवजातीच्या भावना दुखावणारे आहेत. परंतु मला या अविचारी, भेदभावी, स्थानिक प्रशासन, सरकार पोलीस यांना सांगायचा आहे की इथे तुम्ही सामान्यांचे व व्हीआयपींची अंत्यसंस्कार यामध्ये भेदभाव नक्की कराल परंतु मृत्युमुखी पडणारा सामान्य व व्हीआयपी हा भेदभाव स्मशानभूमीत चालत नाही. कारण दोघांचेही अंतिम सत्य ही स्मशानभूमीचं आहे. उगवणारा सूर्य मावळत असतो. जन्मणारी प्रत्येक व्यक्ती जन्मासोबतच मृत्यू सोबत घेऊन आलेली असते. इथे तुम्ही भेदभाव कराल परंतु जीवनाच्या अंतिम सत्यामध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही. मानव हा फक्त स्मशानभूमीपर्यंत भेदभाव करू शकतो परंतु तिथून पुढे भेदभाव करणे हे मानवाच्या हातात नाही हे सरकारने ध्यानात घेणे गरजेचे आहे. केवळ मलाच नाही तर सर्वांनाच व्हीआयपी असतील किंवा सर्वसामान्य व्यक्ती असतील यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचे अतीव दुःख हे होतेच परंतु त्या व्हीआयपींच्या नातेवाईकांना जसे वाटते की ते ज्यांच्यावर ते जीवापाड प्रेम करतात त्या व्यक्तीचे अंतिम दर्शन त्यांना व्हायला हवे तशीच भावना मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्यांच्या नातेवाईकांचीही असते ना?  मग हा भेदभाव कशासाठी? सर्व कोरोना मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जो तो मृतदेह त्या त्या नातेवाइकांच्या ताब्यात देऊन टाका. ते त्यांच्या त्यांच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करतील आणि जर तसे नको असेल.. कोरोना पसरते असे वाटत असेल तर मग व्हीआयपी असेल किंवा सर्वसामान्य असेल त्यांना त्यांचे अंत्यसंस्कार एकाच पद्धतीने करा ते म्हणजे डायरेक्ट स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्नी देणे. जेव्हा एखादया  गरीब कुटुंबातील व्यक्ती कोरोनाने मृत्युमुखी पडतो आणि त्या कुटुंबातील व्यक्तींना त्या मृतदेहाचे अंतिम क्षणी तोंडही पाहू दिले जात नाही तेव्हा त्यांच्या मनात किती वेदना होत असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. सरकारला या सर्व गोष्टींची कल्पना नसते किंबहुना सरकारला त्या गोष्टींशी देणेघेणे नसते. परंतु मला परत एकदा अंत्यसंस्कारमध्ये भेदभाव करणाऱ्या या पोलिसांना, सरकारला स्थानिक प्रशासनांना एकच सांगायचं आहे की तुम्ही फक्त स्मशानभूमीपर्यंत भेदभाव करू शकता परंतु तिथून पुढे जी प्रोसेस आहे ती तुमच्या हातातील गोष्ट नाही हे सरकारने स्थानिक प्रशासनाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि इतकेच नाही तर प्रत्येकाची अंतिम घर हे स्मशानभूमी आहे. त्यामुळे गरीब व व्हीआयपींच्या अंत्यसंस्कारमध्ये भेदभाव करून पाप पदरात पाडून घेऊ नका. परवानगी द्यायची असेल तर सर्वांना आपापल्या रितीरिवाजानुसार मृतदेहाचे अंत्यसंस्कार करू द्या आणि नसेल तर सर्व कोरोना मृतदेह मग तो गरीबाचा असेल किंवा व्हीआयपींचा हॉस्पिटलमधून थेट स्मशानभूमीत नेऊन अग्नी द्या परंतु हा भेदभाव हा अत्यंत चुकीचा आहे असं मला वाटते…

…………………….चिदानंद चाबुकस्वार.. 9145612870.. सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *